Ticker

6/recent/ticker-posts

बापू भेगडे एक लाख मतांनी विजयी होणार...

मावळ - संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या मावळ पॅटर्नची चर्चा चालू आहे. मावळ मतदार संघामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक चुरशीची झाली आहे.  बापूसाहेब भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर लगेचच मावळ भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद घेऊन बाळा भेगडे यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केल्याने मावळ तालुक्यामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी यांनी अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा दिलेला आहे. 

पहिल्यांदा मावळमध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र निर्माण झाले होते. परंतु रवींद्र भेगडे यांनी किंगमेकरची भूमिका घेत बापू भेगडे यांना पाठिंबा दिला. दिनांक ४ रोजी काही उमेदवारांनी माघारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक मैदानामध्ये सहा उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये तुल्यबळ उमेदवार मध्ये  बापूसाहेब भेगडे विरुद्ध सुनील शेळके यांची समोरासमोर लढत होणार आहे. बापूसाहेब भेगडे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने अजूनही त्यांचा विजय सोयीस्कर झाला आहे. त्यात शिवसेना (उबाठा गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही पाठिंबा दिला आहे. वारकरी संघटना तसेच विविध पक्ष, जाती- जमातीत मधील संघटना यांनीही बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. 

खऱ्या अर्थाने जनता बापू भेगडे यांच्या पाठीशी उभे असल्याने बापू भेगडे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल चालू असून एक लाख मतांनी विजयी होतील असे मा. मंत्री बाळाभाऊ भेगडे हे भाषणामध्ये बोलताना सांगत आहे. 

येणाऱ्या २३ तारखेलाच मतपत्रिका द्वारे कळणार आहे मावळ विधानसभेचा आमदार कोण होणार ?