Ticker

6/recent/ticker-posts

अहिरवडे गावामध्ये लाईट नसल्यामुळे नागरिकांना गढूळ पाणी व इतर समस्या मुळे नागरिक त्रस्त...


दि. 25-अहिरवडे गावामध्ये कालपासून लाईट नसल्यामुळे नागरिकांना  विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, गावामध्ये फिल्टर लाईन ही पूर्णपणे विजेवर अवलंबून असून कालपासून लाईट नसल्यामुळे नागरिकांना गढूळ पाणी मिळत आहे.

 याबाबत वायरमन शेवाळे यांच्याशी संपर्क केला असता लाईट उद्या येईल असे सांगितले जात आहे परंतु एवढी दिरंगाई कर्मचारी करत आहे यामुळे गाव डोंगराळ भागामध्ये असून रात्री संपूर्ण अंधार असल्यामुळे वन्यजीवांचाही धोका होऊ शकतो  ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 लाईट अभावी  मोबाईल फोन चार्जिंग नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे  आम्ही वारंवार वायरमेन तसेच वरिष्ठ अधिकारी यांना लवकरात लवकर लाईट घेण्याची विनंती केली आहे प्रश्न नाही मिटल्यास आम्ही वडगाव येथील mecb कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा उपसरपंच स्वाती पाराटे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या