कामशेत मध्ये सर्वपक्षीय उमेदवार बाप्पूअण्णा भेगडे यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काल बाजारपेठेमधून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत प्रचार दौरा करण्यात आला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट ),मनसे शिवसेना (उबाठा गट) व इतर पाठिंबा दिलेले पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
बाजारपेठ मधील प्रत्येक दुकानात तसेच घरोघरी कुटुंबामध्ये जाऊन त्यांना उमेदवाराच्या विषयी माहिती तसेच पिपाणी या चिन्हाची माहिती देण्यात आली. कामशेत मध्ये मतदार संख्या ही दहा हजारांच्या आसपास आहे त्यामुळे कामशेत निवडणुकीमध्ये केंद्रबिंदू ठरणार आहे