कामशेत दि.९ - ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे (कामशेत) मध्ये अचानक सत्ताधारी गटातील १० सदस्यांनी राजीनामा दिल्याने शहरात मोठी खळबळजनक बातमी आली आहे. खडकाळे ग्रामपंचायत ही मावळ तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजली जाते शहरात दररोज ग्रामिण भागातील ५० गावातील नागरिकांचे जाणे येणे असते अशा मोठ्या ग्रामपंचायत खडकाळे मध्ये एकुन १७ सदस्य आहेत यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट व एसआरपी मिळून १३ सदस्य आहेत . त्या मधील १० जनांनी राजीनामा दिल्याने सत्ताधारी गटाकडे ३ सदस्य उरतात. विरोधी पक्ष यांचे ४ सदस्य आहेत.
शहरातील इंद्रायणी कॉलनी, पंचशील कॉलनी,गरुड कॉलनी व इतर काही भागात पाण्याच्या,कचर्याच्या व इतर समस्या मोठ्या असताना अचानक राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदस्यांची नाराजी नक्की कोणावरती आहे त्यामुळे त्यांनी अचानक राजीनामा दिला ? का शहरामध्ये सदस्य यांचे म्हणने कोणी ऐकत नाही?
मागील दि.३१/५/२०२४ च्या मासिक मीटिंगमध्ये दहा सदस्यांचे राजीनामा अर्ज मीटिंगमध्ये आलेने ही गोष्ट निदर्शनास आली.पाहूया या बाबत ग्रामसेवक संतोष शिंदे काय निर्णय घेतात...
दहा सदस्य यांचे राजीनामाचे पत्र मासिक मिटिंग मधे आले आहे.गावात पाणी समस्या असल्याने अचानक राजीनामा देणे हे ग्रामपंचायत मधील सत्ताधारी यांचे अपयश आहे - गणपत शिंदे ,विरोधी पक्ष नेते, ग्रामपंचायत सदस्य
मागील तीन वर्षांमध्ये ग्रामपंचायत यांनी पाणी प्रश्नावर कोणतेही नियोजन करण्यातात आलेले नाही.सत्ताधारी सदस्यांचा अंतर्गत सलोखा नाही या मुळे कामशेतच्या विकासावर दुषपरिणाम होत आहे - प्रविण शिंदे ,अध्यक्ष भाजपा युवा कामशेत
-----------------