Ticker

6/recent/ticker-posts

पुणे रिंगरोड मार्गाकरिता मौजे इंदोरी येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

पुणे रिंगरोड मार्गाकरिता मौजे इंदोरी येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
पुणे:२१/०८ |पुणे रिंगरोड मार्गाकरिता मौजे इंदोरी येथील भूसंपादनाची परीगणना चुकीच्या पध्दतीने झाल्यामुळे शेतकरी बांधवांना कमी मोबदला मिळणार होता मावळचे खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे यांनी व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कडे पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार सदर क्षेत्रांची पुनर परीगणना करून बाकीच्या गावाप्रमाणे प्रमाणे हंगामी बागायती जमिनीस जिरायत जमिनीच्या १.५ पट व बागायती जमिनीस जिरायती जमिनीच्या २.० पट मोबदला मिळावा आणि इंदोरी गावातील बाधित शेतकऱ्यांना मोबदला स्वीकारणाच्या नोटिसा दिल्या गेल्या होत्या त्यासंदर्भात मुदत वाढ मिळावी यासाठी आज जिल्हाधिकारी मा.डॉ.सुहास दिवसे,भूसंपादन अधिकारी मा.कल्याण पांढरे, MSRDC चे अभियंता श्री.अरंगळे यांची भेट घेतली व त्यांनी प्रस्ताव रिंगरोड व्यवस्थापक समितीने वाढीव मोबदला देण्याचे आश्वासन दिले आणि शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली
  यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत (आण्णा) ढोरे,मा.सभापती ज्ञानेश्वर दळवी, मा.पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, अरुण पानसरे व शेतकरी उपस्थित होते