कामशेत शहरातील अत्यंत उच्चशिक्षित व्यक्तिमत्व डॉ. यशोधन मनोहर मिठारे यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेच्या अधिष्ठाता (DEAN , Faculty of Commerce and Management, Savitribai Phule Pune University ,Pune) पदाची सूत्रे हातात घेतली. संविधानिक दृष्ट्या राजपत्रित अधिकाऱ्यांचे (gazetted officer ) हे पद आहे.
पंडित नेहरू विद्यालय , कामशेत येथे शिक्षण घेतल्यापासून त्यांनी यशाची विविध शिखरे प्राप्त केलेली आहेत . त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक शैक्षणिक पुस्तकाचे लेखन केलेले आहे . कठोर परिश्रमाच्या जोरावर मनुष्याला यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येते हेच त्यांनी दाखवून दिले आहे. इतक्या उच्च पदावर कामशेतची व्यक्ती विराजमान झाल्याने कामशेतच्या नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले असुन त्यांना फोन ,सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
कामशेत शहरात मिठारे कुटुंब यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे कामशेतकर असल्याने आम्हाला त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिमान आहे - अभिमन्यू शिंदे