Ticker

6/recent/ticker-posts

पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय कामशेत,माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन...

कामशेत :- “अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती.”  या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात उतरली. रविवार (दि. १० मार्च) रोजी पंडित नेहरू विद्यालय कामशेत, माजी विद्यार्थी सन २०१० मधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आणि प्रीत भोजनाचे आयोजन रत्ना रिसॉर्ट,कामशेत येथे करण्यात आले होते.
                    सन २०१० नंतर तब्बल १४ वर्षानंतर स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ४५ माजी विद्यार्थी परत एकदा एकत्र आलेले.सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. सर्वं जण शाळेतील आठवणीना उजाळा देत होते.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित नेहरू विद्यालयाच्या मुख्यध्यापिका सौ.साबळे मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून फुलपगारे मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका जाधव मॅडम, गडहिरे मॅडम, वाघ मॅडम उपस्थित होत्या.

      यावेळी मुख्यध्यापिका डुंबरे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की अशा कार्यक्रमाच्या आयोजनातून आपणा सर्वांना एक प्रकारची आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा मिळतं असते.आयुष्यात आपल्या आई-वडिलांची,सासू-सासऱ्याची,  घरच्यांची,समाजाची सेवा करावी.आपल्या पुढील पिढीवर चांगले संस्कार घडवावेत.
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे माजी विद्यार्थी समीर भोसले यांनी केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल गरुड यांनी केले तसेच आभार आदेश वंजारी,सुनील वाजे यांनी मानले.
     यावेळी शाळेचे माजी विद्यार्थीनी सुजाता गरुड, प्रियांका आडकर, निलम चव्हाण, स्नेहल गायकवाड, किरण तारू, स्वाती वावरे, पुजा गुगळे,अर्चना गायकवाड, रेश्मा गायकवाड, रेश्मा काळडोके, माधुरी हजारे, साधना शिंदे तसेच माजी विद्यार्थी वैभव शिंदे, विशाल मांदळे, दिनेश भानुसघरे, सुरज पुरी, अक्षय पठाडे, किरण वाघमारे, रोशन शेडगे, विशाल पवार, सोमनाथ खेंगले, स्वप्नील मोरे, सचिन पवार, उल्हास शिंदे, सद्गुरू काजळे, शरद वाघुले, अमित गायकवाड, सतीश वावरे, वैभव देशमुख, प्रदीप पिंगळे,  मच्छिंद्र बालगुडे, शंकर प्रजापती, हितेश जैन, करण काळे, अनिकेत मेदगे, अक्षय मुळे आदी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद घेतला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अथक परीश्रम घेतले.