तळेगाव दाभाडे :- तळेगाव दाभाडे येथील शेतकरी तरुण मंडळाच्या वतीने तळेगाव स्टेशन येथील तळ्यावर वृक्षारोपनाचा सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आला.
शेतकरी मित्र मंडळ, कुंभारवाडा, तळेगाव दाभाडे व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा कार्यक्रमाच्या अंतर्गत वृक्ष लागवडीचा उपक्रम तळेगाव दाभाडे येथील तळेगाव स्टेशन वरील तळ्यावर करण्यात आला यामध्ये १०० देशी झाडांच्या जातीचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष केदार भेगडे म्हणाले, "सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण पूरक असा गणेशोत्सव साजरा केला पाहिजे आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेऊन पर्यावरण स्नेही कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे."
0 टिप्पण्या