मोशी दि.५- डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भास्कर येवले हा प्रथम विजेता ठरला. तर द्वितीय रोहन कवडे आणि तृतीय क्रमांक शार्दूल भेगडे यांना देण्यात आला
उत्तेजनार्थ: अंकिता शिंदे, तेजस पाटील, चैतन्य बनकर, यश कुलकर्णी, पृथ्वीराज सूरी यांना देण्यात आला.
या स्पर्धेचे उद्घाटन स्वामी विवेकांनंद शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालिका सौ.कविता भोंगाळे यांच्या हस्ते झाला.तर बक्षीस वितरण स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष विनायक जी भोंगाळे यांच्या हस्ते झाला Development Foundation For Maharastra संस्थेचे श्री. सुजित शिळीमकर, सर आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील *150 पेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केलेली होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकता सौ.कविता भोंगाळे यांनी सांगितले की उपमुखमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून काम करणारी ही संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना व वक्तृत्वाला वाव मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्वाना पुढच्या भविष्या साठी शुभेच्छा दिल्या .या पुढील काळात देखील अश्या प्रकारे सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहेत.
मा. श्री विनायक भोंगाळे यांनी स्वतःच्या कौशल्यांचा वापर देशाच्या विकासासाठी करावा व देशातील बळीराजाला विसरू नये हे मत व्यक्त केले.
स्पर्धेचे परीक्षण सौ. कामिनी चौहान,सौ. दिव्या भोसले, श्री किरण कदम, दिनेश गाळकर यांनी केले.
सूत्रसंचालन राम शिंदे यांनी केले.तसेच आभार सौ.भारती पाटील यांनी व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमचे व्यवस्थापक श्री मंगेश गुरव, सिद्धार्थ भोजने,कुणाल कड्डे, अभिमन्यू शिंदे, ओंकार कदम, वाकडे सर व सर्व गायत्री इंग्लीश मीडियम स्कूल चे स्टाफ यांनी विशेष प्रयत्न केले. ही स्पर्धा गायत्री इंग्लीश मीडियम स्कूल मध्ये पार पडली.
0 टिप्पण्या