भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी पुणे जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांची निवड झाली. त्यांना आज दिनांक ७ रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
गणेश भेगडे यांनी पुणे भाजपा जिल्हाध्यक्ष कार्यकर्दी अतिशय यशस्वीपणे पूर्ण केली त्याबद्दल भाजपा प्रदेशशाने काही दिवसांपूर्वी त्यांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी वर निमंत्रीत सदस्य म्हणून जबाबदारी दिली होती. आज त्यांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे .
मावळ तालुक्याला भाजपा प्रदेश पातळीवर मोठे पद मिळाल्याने जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
0 टिप्पण्या