श्री क्षेत्र देहू - अथर्व संगीत विद्यालय शाखा श्री क्षेत्र देहू येथे गुरुपुजन सोहळा दिनांक ८/७/२०२३ रोजी संपन्न मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. प्रसंगी प्रथम संत प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर आदरणीय गुरुवर्य बंडोपंत खामकर गुरुजी, आदरणीय गुरुवर्य हभप. ज्ञानेश्वर महाराज गाडगे गुरुजी व प्राचार्या आदरणीय जयश्रीताई गाडगे
यांचे पूजन व शाल व श्रीफळ देऊन यांचा सन्मान ज्येष्ठ सहकारी प्रेरणास्थान दशरथ येवले यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.
हभप. ज्ञानेश्वर महाराज गाडगे सर यांचे विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरा संतांची व ज्ञानेश्वरीतील दाखले देऊन विद्यार्थ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाच्या प्राचार्य जयश्रीताई गाडगे यांनी आभार प्रदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमांमध्ये सर्व शिष्यांनी अभंग रचना सादर केल्या.
0 टिप्पण्या