Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.गोपीचंद कचरे यांची मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळमधे संघटकपदी निवड...


मावळ दि.१०-  मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळामध्ये संघटक पदी प्राध्यापक हरिभक्त परायण गोपीचंद महाराज कचरे यांची निवड करण्यात आली. नियुक्ती जाहीर जाल्याची माहिती टाकवे बु येथे मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी दिले. तेथे मान्यवरांनी गोपीचंद कचरे यांचा शाल श्रीफळ  देऊन सत्कार करण्यात आला.
 प्रा.गोपीचंद कचरे हे मावळ तालुक्यातील एक अभ्यास हुशार व्यक्तिमत्व असून वारकरी सांप्रदायांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे ते स्वतः प्रवचनकार ,कीर्तनकार,प्राध्यापक असून मावळ तालुक्यातील विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत असतात त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांना फोन ,मेसेज द्वारे शुभेच्छा वारकरी देत आहेत.
       या वेळी मंडाळाचे कार्याध्यक्ष संतोष कुभांर,प्रवक्ते सुनिल महाराज वरघरे,आरोग्य समिती प्रमुख राजाराम असवले,सचिव रामदास पडवळ,सचिव नितिन आडीवळे,वि.प्रमुख दिपक वारींगे,सल्लागार सागर शेटे ,महादू नवघणे आदी सांप्रदायिक मंडळी उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या