स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू' असे नाव देण्याचा निर्णय शिंदे - फडणवीस सरकार ने घेतला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली होती. त्यानुसार १४ मे रोजी संभाजी महाराज जयंतीनिमित्त कोस्टला रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले होते. त्यानंतर आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू' असे नाव देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या