कामशेत दि.२७- कामशेत शहरामधे ४५ वर्षांपासून ठाकुरदास सुरतवाला कुटुंब वाद्यकाम दुरुस्ती चे काम करत आहे. सुरतवाला कुटुंब मुळचे गुजरात चे परंतू व्यावसाय निमित्ताने कामशेतला आले अतिशय खडतर परिस्थिती मधे दिवस काढले काही दिवस शेतमजूर म्हाणून काम पाहीले .
वडील अमृतलाल सुरतवाला यांचा वाद्यकाम दुरुस्तीचा व्यावसाय .त्यातुनच सुरतवाल यांना वाद्यकाम दुरुस्तीचा घरीच प्रशिक्षणाचे धडे मिळाले होते. त्यांनी सन १९८० दरम्यान कामशेत बाजारपेठ येथे भारत वाद्यलय नावाने छोटे दुकान टाकले त्यात त्यांना पत्नी जयश्री यांचे मोठे योगदान मिळाले. त्यातुनच त्यांनी आपला व्यावसाय पुढे चालवला.आज त्यांच्याकडे मावळ,मुळशी, रायगड भागातील वारकरी तसेच कलावंत पखवाज, तबला,ढोलकी,संबळ ,ढोल ताशा दुरुस्ती साठी घेऊन येतात."जुने लोक आजही सांगतात ठाकुरदासनी भरलेली शाई दोन-तीन वर्ष हालन नाही "
आजही कलावंत विश्वासाने त्यांच्याकडे वाद्यदुरुस्ती साठी देतात.
ठाकुरदास सुरतवाला कुटुंब सुखवस्तू मधे आहेत. यांनी पुढील पिढीला वारसा देत त्यांचा मुलगा राजुलाही उत्तम दुरुस्तीचे काम शिकवले राजुने कामाबरोबर वारकरी सांप्रदाय मधे मावळ तालुका दिंडी समाज मधे चोपदार यांची सेवा देत आहे.
कुळीं कन्या पुत्र होती जीं सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा
0 टिप्पण्या