मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीमधे उपाध्यक्ष पदी निवड झाली. काल सोलापूर जिल्हा प्रभारीपदी निवड झाली. १६ लोकसभा प्रवासी संयोजक मधे उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपाध्यक्षपदी निवड केली असे बोलले जाते.प.महाराष्ट्र मधे मराठा समाज्याचे प्राबल्य आहे. जिल्हयात प्रशासनात त्यांची चांगलीच वचक आहे.प्रशासनातील अधिकारी वर्ग मोक्याच्या ठिकाणी बदली व्हावी या साठी संपर्क कार्यालयाच्या चकरा मारत आहे. प.महाराष्ट्र मधे वाढता दबदबा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अंत्यत विश्वासू मानले जातात. या मुळे बाळा भेगडे हे येत्या काही दिवसात किंग मेकर ठरु शकतात.
पंढरपुर मधील पोट निवडणूकीची जबाबदारी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदार संघाची जबाबदारी आता गुजरात येथील नवसारी जिल्हा च्या निरिक्षक पदी निवड अशा जबाबदार्या मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पेलल्या आहेत.
0 टिप्पण्या