Ticker

6/recent/ticker-posts

मंचर मधील लव्ह जिहादचे प्रकरण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आणले उघडकीस....


 देशात आणि राज्यात लव्ह जिहादच्या घटना घडत असलेल्या बातम्या कानावर दररोज येत आहेत. मंचरमध्ये गेल्या चार वर्षांपासून लव्ह जिहादचा प्रकार घडलाय. द केरला स्टोरी पाहिल्यानंतर पालकांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्याना सर्व घटना सांगितली असे त्यांनी सांगितले. त्या मुलीला घरात कुलूप लावून कोंडून ठेवण्यात आलं होतं. मुलीच्या अंगावर सिगारेट चटके देण्यात आले. तसेच तिला गैरप्रकार करण्यास सांगितले गेले. नमाज करायलाही तिला सांगण्यात आले. माजी गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली. 
पवारांची मुलगी म्हणते लव्ह जिहादचा अर्थ मला माहिती नाही. या मुलीला भेटा म्हणजे नेमकं काय ते कळेल अशी टीकाही पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली. या रॅकेटमध्ये कोण कोण आहे त्याचा शोध लागला पाहिजे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन कारवाई करावी यासाठी एसपीना भेटलो. आरोपी मुलगा सध्या जेलमध्ये असून मतांच्या राजकारणासाठी काही जण लव्ह जिहाद नाही अशा गप्पा मारतात त्यांनी या मुलीची मुलाखत घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला.  लव्ह जिहादच्या घटना घडू नये यासाठीं  हिंदूत्ववादी संघटना समाज्यात जनजागृती करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या