वडगाव मावळ - तहसील कार्यालयात रेशनिंग विभागाकडून आर्थिक दुर्बल घटकांना अजूनही लाभ मिळत नाही. सहा महिन्यांपूर्वी मावळ तालुक्यामध्ये अचानक ५०० गुलाबी,पिवळे रेशनिंग धारकांचे रेशनिंग बंद करण्यात आले. त्यानंतर चौकशी केली असता त्यांनी अन्नसुरक्षा लाभार्थीचे फॉर्म भरा आपले रेशनिंग पुन्हा चालू होईल असे सांगण्यात आले.
नागरिक फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात गेले की तेथून ते रेशनिंग दुकानात यांच्याकडे द्या आणि ते म्हणतात की तहसील कार्यालयामध्ये द्या असे म्हणत नागरिकांना चकरा मारण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही तद्नंतर यांनी रेशनिंग दुकानदार यांच्याकडे अर्ज देण्यास सांगितले.
अन्नसुरक्षा लाभार्थीचे अर्ज भरले परंतु अद्यापही त्यांचे रेशनिंग चालू झाले नाही तिथे वशिलेबाजी खूप चालते अजूनही आर्थिक दुर्बल घटक यापासून वंचित आहे. काही आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांकडे रेशनिंग कार्ड आहे परंतु बारा अंकी नंबर नाही त्यामुळे ते लाभ मिळण्यापासुन अजूनही वंचित आहेत. तहसीलदार यांना वारंवार सूचना करण्यात आलेल्या आहेत तरी अध्यापही त्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.
0 टिप्पण्या