Ticker

6/recent/ticker-posts

कार्यकर्ता होणे सोपे पण भावी नवरदेव होणे खुप अवघडच राव....

सद्या लग्न सराईत जोरात चालू आहे.रोजची लग्न  कार्यालय फुल आहेत मोठ्या घरातील लग्न एक- दोन तास लेट होत आहे लोकही पंचपक्वानाचा ताव मारुनच घर गाठत आहे.परंतु आमचा बाब्या फकस्त कार्यकर्ताच राहिला त्याला पक्षाचं वेगवेगळे पद भेटले लोक त्याला भावी अध्यक्ष,भावी सरपंच म्हणूनही बोलतात पण बाब्याला भावी नवरदेव कुणी बोला ना हीच बाब्याची खंत बाब्याची पार पस्तीसी ओलांडली ना राव ...असीच गत मावळातील लग्न रखडलेल्या तरुणाची झालेली आहे. एक वेळ पक्षाचा कार्यकर्ता होणे सोपे झाले परंतु एखाद्या तरुणाला नवरी  मिळणे अवघड होऊन बसले आहेत. काहींनी तर मध्यस्तींना काही करुन लग्न जमव बाबा आर्धी तोळा देतो अशी ही अमिषे दाखवत आहेत.
काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर नवरी  मिळाना म्हणून भावी नवरदेवांनी मोर्चा काढला होता. मावळात २००६ साली ७/१२ तेजीत असल्याने ५ एकरवून १० गुठ्यावर शेतकरी आला मग जमिन नाय तर मुलगी नाय असे अखडुन मुलीचे बाप बसलेत.काही ठिकाणी मुलगी ग्रॅज्युएट तर बाब्या ८ वी नापास  ते ही जमाना मग काय आपला बाब्या निघाला पांढरी खादीची कपडे घालुन ,मेळावे, गावची जत्रा ,बैलगाडा शर्यतीवर ,लग्न सोहळे , हेच बाब्याचे दैनंदिन कार्यक्रम.

 काही दिवसांपूर्वी लग्नाला मुलगी मिळाला म्हणून एका तरुणाने औषध पिल्याची घटना घडलेली आहे...
(बाब्या हे काल्पनिक नाव आहे .कोणाशी संबध आल्यास योगायोग समजावा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या