मुख्यमंत्री साह्यता निधी बाबत मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.विविध आजारांवर उपचारासाठी गोरगरीब लोकांना पैशाची अडचण भासत असते. आजच्या काळात वैद्यकीय सेवा खूप महाग झाल्या आहेत. एखादी शस्त्रक्रिया करायची म्हटल्यावर लागणारा खर्च हा खूपच जास्त असतो. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक मिस कॉल दयावा लागेल आणि मदतीचे दरवाजे तुमच्या करिता खुले होणार आहे. सरकारने नुकताच हा मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळणार आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया व आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो, यासारख्या विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत. ग्रामीण भागातील जनतेला हा अर्ज मिळवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला असून एका मिसकॉलवर आता निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिसकॉल देताच तत्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
0 टिप्पण्या