कामशेत दि.३०- कामशेत शहरांमध्ये हिंदू उत्सव समिती व ग्रामीण परिसर वतीने श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात आला पंडित नेहरू विद्यालय पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत जय श्रीराम च्या गगनभेदी घोषणा, भगवे झेंडे ,पताका,फटाक्यांची आतिषबाजी करत सकल हिंदू बांधव सोभयात्रेमध्ये सहभागी झाले यामध्ये बाल,महीला भगीनी,तरुण,व्यापारी, जेष्ठांनी उपस्थिती दाखवत रेकॉर्ड ब्रेड गर्दी पाहायला मिळाली. कामशेत शहर व नाणे मावळ परिसरातील 45 गावांनी सहभाग घेतला..
छत्रपती शिवाजी महाराज चौक कार्यक्रम ठिकाणी एडवोकेट मृणालीताई पडवळ यांचे व्याख्यान झाले त्यानंतर धर्मवीर स्वराज्य रक्षक मालिकेतील शिवशाहीर संतोष साळुंखे यांचे पोवाडा हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचे आयोजन नियोजन उत्सव समिती कामशेत सर्व ग्रामीण परिसर वतीने करण्यात आले.
0 टिप्पण्या