Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर वतीने सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रम...



पुणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार,पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री,तळेगाव दाभाडे नगरीचे कर्तृत्ववान सुपुत्र,कार्यकर्ता प्रिय नेतृत्व 
स्व गिरीषजी बापट साहेब यांच्या स्मरणार्थ सर्व पक्षीय श्रध्दांजली कार्यक्रम आज गुरुवार दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वा.नाना नानी पार्क सभागृह येथे सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते व विविध संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात स्व.बापट साहेब यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.गणपतराव काळोखे गुरुजी आणि मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री मा.बाळाभाऊ भेगडे,विद्यमान आमदार मा.सुनिलजी शेळके,जिल्हाध्यक्ष मा. गणेशजी भेगडे,संत तुकाराम सह.साखर कारखाना उपाध्यक्ष मा. बापूसाहेब भेगडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मा.गणेशजी खांडगे,जनसेवा समिती संस्थापक अध्यक्ष मा. किशोरभाऊ आवारे, मावळ तालुका भाजप अध्यक्ष श्री.रविंद्र आप्पा भेगडे,माजी नगराध्यक्ष मा.रविंद्रनाथ दाभाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा.गणेशजी काकडे,भारतीय जनता पक्ष शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, माजी उपनगराध्यक्ष मा.सुशिलजी सैंदाणे,कलापिनी संस्था विश्वस्त डॉ. अनंतजी परांजपे,डॉ.शाळिग्राम भंडारी,मनसे नेते मा.सचिन भांडवलकर,रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष मा.संदिपजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा शैलजाताई काळोखे,शिवसेना शहर प्रमुख मा.दत्तात्रय भेगडे,शिवसेना उबाठा शहर प्रमुख मा.देवा खरटमल,ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.दत्तात्रय मेढी काका,श्री.दौलतभाऊ भेगडे यांनी स्व.बापट साहेब यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस श्री.प्रमोदजी देशक आणि सरचिटणीस श्री. विनायक भेगडे यांनी केले.
या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते,पत्रकार बंधू,कार्यकर्ते,विविध संस्था पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व सहकार्य भाजपा नेते श्री.अशोकशेठ काळोखे आणि भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी,मोर्चा - आघाडी पदाधिकारी यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या