Ticker

6/recent/ticker-posts

शिलाटणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी जनाबाई कोंढभर यांची बिनविरोध निवड....


 मावळ तालुक्यातील शिलाटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई विनायक कोंढभर यांची आज दिनांक ८/३/२०२३ रोजी  बिनविरोध निवड झाल्याने त्यांना मावळ भारतीय जनता पार्टीच्या तालुका पदाधिकारी यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

 या वेळी भाजपा तालुका सरचिटणीस मच्छिंद्र केदारी, भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, पत्रकार संजय हुलावळे,मा.उपसरपंच नवनाथ कडू,भाजपा उपाध्यक्ष विनायक कोंडभर, कामशेत शहराध्यक्ष प्रवीण शिंदे,सरचिटणीस कृष्णा ठाकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसरपंच अश्विनी भानुसगरे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानेसरपंच गुलाब अहिरे यांच्या अध्यक्षखालीली ग्रामसेविका रूपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.निर्धारित वेळेत कोंडभर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी यांनी जनाबाई कोंडभर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या