मावळ तालुक्यातील युवा शिवभक्त मल्हार गडावरून शिवज्योत आणत असताना पुणे येथे झालेल्या अपघातात काही तरुण गंभीर जखमी झाले आज सकाळी तात्काळ त्यांची सोमाटणे येथील पायोनीर व पवना हॉस्पिटल येथे भेट घेऊन धीर देण्याचा प्रयत्न मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केला.
शिवभक्तांच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले असता आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे तात्काळ भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वांचा मोफत उपचार व्हावा यासाठी मागणी केली.
आपल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शिवभक्तांच्या हॉस्पिटलचा सर्व खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
0 टिप्पण्या