पिंपरी चिंचवड मतदार संघामध्ये आमदारपदी दिवंगत आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई_लक्ष्मण_जगताप या ३६ हजार एवढ्या मताधिक्याने विजयी झाल्याने , कामशेत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक २/३/२०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक,कामशेत येथे फटाके वाजवत विजय जल्लोष साजरा केला.तसेच कामशेत शहर युवा अध्यक्ष प्रविण शिंदे यांनी नागरिकांना लाडू वाटत तोंड गोड केले.
यावेळी मावळ भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,मा.सरपंच वसंत काळे,जेष्ठनेते बाळासाहेब गोरे,कार्याध्यक्ष शंकर पिंगळे, दत्तात्रय भोईर,अर्जुनजी शिंदे,बबलु सुर्वे, गणेश शिंदे, सुहास लोंणकर आदी भारतीय जनता पार्टी कामशेत पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या