मावळ दि.१- मावळ तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव पक्ष कार्यालयात आज दि.१/१२/२०२२ रोजी २५१ लाभार्थ्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली. यासाठी मा. राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांनी विशेष मेहनत घेतली.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मावळ तालुक्यातून १६७०० जणांनी लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते .या अर्जांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांनी छाननी होऊन पहील्या टप्यात मावळ तालुक्यातील पहिल्या टप्प्यामधील शिवणे, भोईरे, साते, ठाकूरसाई ,कडधे ,डोणे, ब्राम्हणोली, करंजगाव,ओवळे, काले, धनगव्हाण ,दिवड, महागाव, येलघोल, पुसाणे ,आढले खुर्द,येळसे, साळुंब्रे आदी गावांमध्ये नियम अटीचे पालन करून १३९८ व त्या नंतर ६१५ असे २०१३ घरांना पक्के बांधकाम करण्यास मंजुरी आदेश देण्यात आले आहेत .त्या मधील आज २५१ लाभार्थ्यांना प्रत्येक्ष कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली.
मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी २०१९ ला भाजपचे सरकार असताना घरकुल योजना मंजूर करून आणली होती.परंतु त्यांनंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्याने सामान्य नागरिकांच्या घरकुल योजनेचे काम गेले अडीच वर्षे रखडले होते.राज्यात सत्तातरण घडून शिंदे-फडणवीस सरकार आल्याने पुन्हा बाळा भेगडे यांनी पाठपुरावा करून सामान्य नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे,जेष्ट नेते शंकरमामा शेलार,तालुका प्रभारी भास्करआप्पा म्हाळसकर,लोकसभा प्रभारी प्रशांत ढोरे, महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे, संघटनमंत्री किरण राक्षे, मा.सभापती गुलाबकाका म्हाळसकर, निकिताताई घोटकुले, कल्याणीताई ठाकर,उपसभापती शांतारामबापू कदम, दत्ताभाऊ शेवाळे,महीला आघाडी कार्याध्यक्ष सुमित्राताई जाधव, बाबूलालमामा गराडे, मच्छिंद्र केदारी ,गणेश धानिवले, जितेंद्र बोत्रे, अनंता कुडे ,अभिमन्यु शिंदे बाळासाहेब जाधव आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात प्लींथ लेवल पर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यावर १००००० रू, दुसऱ्या टप्प्यात छताचे बांधकाम पूर्ण झाल्यावर १०००००, तिसऱ्या टप्प्यात घराचे बांधकाम पूर्ण होऊन सर्वात महत्वाचा दाखला मिळाल्यानंतर ५०००० हजार असे लाभार्थ्यास एकुण २५००००/रक्कम रूपये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणार आहेत.
मावळ तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहा हजार लाभार्थ्यांना पक्की घरे मिळावीत यासाठी मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे हे प्रयत्न करणार आहे.
0 टिप्पण्या