मावळ :- आज मंगळवारी,दि.29 रोजी झालेल्या निवडणूकित चेअरमन पदी सीमा देशमुख आणि व्हा.चेअरमन पदी सीताबाई ज्ञानेश्वर सावंत यांची बहुमताने निवड करण्यात आली.
खांड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाचा बळीराम वाडेकर तसेच व्हा.चेअरमन पदाचा नामदेव जाधव यांनी दिलेल्या राजीनामामुळे जागा रिक्त झाली होती.
चेअरमन सीमा देशमुख ह्या मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या भगिनी तसेच मा.सरपंच प्रकाश देशमुख यांच्या पत्नी आहेत
यावेळी पंचायत समिती मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर,मा.उपसभापती शांताराम कदम,यदुनाथ चोरघे संचालक रामदास वाडेकर,नामदेव जाधव,रामदास आलम,आप्पा तुर्डे तसेच संदीप भेगडे,गणेश भेगडे,मा.सरपंच नामदेव भसे,प्रशांत दाभाडे,बबनराव सावंत,उमेश पिंगळे,कैलास सोळंकी,मारुती जाधव,शंकर विनोदे,वाघू दळवी,आनंद देशमुख, राज देशमुख आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या