मावळ :- मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघावर भाजपा,बाळासाहेबांची शिवसेना व आर.पी.आय.(A) महायुतीच्या सौ.कांचनताई नारायण भालेराव यांची चेअरमनपदी तर श्री.अमित ओव्हाळ यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली .
यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे,पश्चिम महाराष्ट्र आर.पी.आय.(A) प्रमुख सूर्यकांतजी वाघमारे,प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर,भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
मावळ तालुका आर.पी.आय.(A) अध्यक्ष नारायणजी भालेराव, मा.सभापती गुलाब काका म्हाळसकर, मा.उपसभापती शांताराम बापू कदम,आर.पी.आय.(A) युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष समीरजी जाधव,खादी ग्रामोद्योग संचालक पत्रकार सुदेशजी गिरमे,गणेशजी भांगरे,सूरज बुटाला,कल्पनाताई कांबळे,शहराध्यक्ष अनंता कुडे यांच्यासह वडगाव नगरीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या