तळेगाव दाभाडे :-तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम चालू असून आमदार सुनील शेळके यांनी सदर इमारतीचे बांधकामाला परवानगी नाकारण्यात यावी यांसाठी जिल्हाधिकारी,पुणे यांना पत्र पाठवले होते.
काल मा.मंत्री बाळा भेगडे यांनी इंद्रायणी महाविद्यालयाला भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे,संदीप काकडे तसेच व्यवस्थापनासह नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून चर्चा केली.
यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की इंद्रायणी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामात राजकारण करून कोणी अडथळा आणत असेल तर विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून पूर्ण ताकदीने संस्थेच्या मागे उभा राहणार आहे.
इंद्रायणी महाविद्यालयात तळेगाव दाभाडे शहरासह मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे.सद्यस्थितीत महाविद्यालयात सहा हजार ते सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
0 टिप्पण्या