कामशेत - मुलींचे आरोग्य व ध्येय प्राप्तीसाठी करावे लागणारे प्रयत्न या विषयावर पुण्यातील नामांकित डॉक्टर, डॉ. वैशाली कटारिया या व्याख्यान देणार आहेत.
कार्यक्रम गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९:३० ते १०:४५ या वेळेत प्रबोधन क्लासेसच्या प्रांगणात होणार आहे. व्याख्यानासाठी वय वर्ष १३ ते वय वर्ष १९ या वयोगटातील सर्व मुलींना प्रवेश दिला जाणार आहे .यावर बोलताना प्रा.धनंजय मिठारेसर म्हणाले की "आमच्या क्लास व्यतिरिक्त इतर मुलींना देखील या व्याख्यानास प्रवेश दिला जाणार आहे .
यश कोचिंग क्लासेस आणि प्रबोधन क्लासेसच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात गेल्या 33 वर्षात उत्तुंग यश संपादन केले आहे .त्यांच्या या अनुभवाचा फायदा आमच्या तसेच कामशेत परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टीने आमचा एक प्रयत्न आहे .यापुढे देखील अनेक माजी विद्यार्थ्यांची व्याख्याने क्लासमध्ये आयोजित करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. ही सर्व व्याख्याने पूर्णपणे विनामूल्य असणार आहेत. तसेच या सर्व व्याख्यानांना क्लास व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना
ही प्रवेश दिला जाणार आहे. कामशेतमधे श्रवण संस्कृती रुजवण्याचा हा आमचा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न आहे असे यश कोचिंग क्लासेस आणि प्रबोधन क्लासेसच्या वतीने सांगण्यात आले.
संपर्क - प्रा.धनंजय मिठारेसर मो.नं. 80073 65800, प्रा.धनेश एडकेसर
0 टिप्पण्या