Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दाभाडे :- डाहुली गावचे युवा नेते प्रदिप पवार यांचा मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश...

 तळेगाव दाभाडे :- डाहुली गावचे युवा नेते प्रदिप पवार यांनी मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे आणि ग्रामपंचायत सदस्य अमित पिंगळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.
        
       राज्यातील सत्तांतरानंतर भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.गेले काही दिवसांपूर्वी मुंढावरे गावचे विध्यमान सरपंच नवनाथ हेलम यांनी पक्ष प्रवेश केला होता.
       
         भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख राजकारणामुळे इतर पक्षातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि पदाधिकारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे असे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी मागे पत्रकार परिषदेत म्हटले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या