Ticker

6/recent/ticker-posts

वडगाव :- मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांच्या यांच्या माध्यमातून वडगाव मावळ नगरपंचायत भागातील पाणीपुरवठा प्रकल्पास 40 कोटी रुपये निधी...

वडगाव :- मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांच्या यांच्या माध्यमातून वडगाव मावळ नगरपंचायत भागातील पाणीपुरवठा प्रकल्पास 40 कोटी रुपये तांत्रिक निधी मंजूर झाला आहे.

          मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी वडगाव शहर नगरपंचायत आणि तळेगाव दाभाडे शहरातील विकास कामा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते.सदर पत्राची दखल घेत वडगाव नगरपंचायत भागांतील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामासाठी अमृत 2.0/ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 40 कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मंजूर देण्यात आली आहे.
    वडगाव शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठयाचा प्रश्न गंभीर होतं चालला होता.वडगाव शहरामध्ये नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून मागील साडेचार वर्षांत पाणी पुरवठा योजनेत नव्याने बदल झालेला नव्हता.शहरातील बहुतांश भागात ग्रामपंचायत काळातील जुनीच पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होती.त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या समस्येला सामोरी जावे लागतं असे.चाळीस कोटी रुपयांच्या निधीमुळे शहरातील पाणी प्रश्न बाळा भेगडे यांच्यामुळे सुटणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या