पुणे :- मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांच्या हाती पुणे जिल्ह्यात निधी वाटपाचे नियोजन...
पुणे जिल्ह्या ग्रामीण भागातील विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटप व कामे अंतिम करण्याचे नियोजन सध्या भाजपचे मावळ तालुक्यातील मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पातळीवर सुरू आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मा.मंत्री बाळा भेगडे तसेच दौडचे आमदार राहुल कुल यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यामधील भाजप- बाळासाहेबांची शिवसेनेचे स्थानिक नेते, कार्यकतें यांच्याशी समन्वय साधून कामांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांवर प्रशासक असल्याने सन २०२२-२३ च्या संपूर्ण निधीचे वाटप व कामांचे नियोजन राष्ट्रवादीचे नेते व माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या मर्जीनुसार करण्यात आले.यामुळे एकूण निधीचा ६० टक्के निधी एकट्या बारामती, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यात वाटप करण्यात आला व शिल्लक ४० टक्के निधीचे अन्य दहा तालुक्यांत वाटप करण्यात आला होता.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेऊन बारामती, इंदापूर आणि आंबेगावच्या निधीला मोठा कट लावत जिल्ह्यात सर्व तालुक्यांना समान निधी वाटप करण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार आता नव्याने जिल्हा नियोजन समितीच्या कामांचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून ग्रामीण भागातील कामांची यादी मागविण्यात येत आहे.
बाळा भेगडे आणि राहुल कुल हे सर्वांकडून याद्या घेऊन कामे निश्चित करण्याचे काम करत आहे.
पुणे जिल्ह्यासाठी सध्या २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ८७५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी वाटप व नियोजन करण्याची जबाबदारी आता भेगडे आणि कुल यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
0 टिप्पण्या