Ticker

6/recent/ticker-posts

मावळ :- मुंढावरे गावची "बत्ती गुल"...

मावळ :- मुंढावरे गावातील वीजपुरवठा गेले चार दिवस खंडित आहे.गावातील ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने शुक्रवार,दि.१८ पासून आजपर्यंत गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला नाही.गावात वीज पुरवठा होत नसल्याने नागरिकांना, विध्यार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोरी जावे लागतं आहे.
       मुंढावरे गावाचे सरपंच नवनाथ हेलम यांनी महिना भराच्या आतच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप मध्ये आणि भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या दिवसापासून गाव अंधारात आहे.एकीकडे सरपंच राजकारण करत पक्ष प्रवेश करत आहे.पण दुसरीकडे गावातील समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत आहे.

 शेखर वाघमारे(मा.सदस्य) :- सप्टेंबर महिन्यात देखील गावातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता.त्यावेळी मा.सरपंच बाळासाहेब वाघमारे आणि मी मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांची भेट घेऊन गावातील वीज समस्या सोडवण्याची विनंती केली होती.तेव्हा बाळाभाऊ भेगडे यांनी कार्यकारी अभियंता महावितरण,खेड यांना संपर्क करून तात्काळ एक दिवसांत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला होता.पण काही राजकीय मंडळींनी सदर कामाचे श्रेय लाटले होते.आता गेले चार दिवस गाव अंधारात आहे पण श्रेय घेणारी मंडळी गावची समस्या सोडवताना दिसतं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या