Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्री साठी ठेऊ नये हिंदू समिती कामशेत वतीचे अवाहन....

कामशेत दि.२१ - कामशेत शहरातील फटाके विक्री दुकानात हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्री साठी ठेऊ नये यासाठी हिंदू समिती कामशेत वतीने प्रत्येक फटाके विक्री करत असलेल्या दुकानदार मालकास अवाहन करत विनंती पत्र दिले.
 
देशातील मोठी फटाके विक्री कंपनी अनिल फायर वर्क्स व इतर फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना  लवकरच लेखी निवेदन देण्यात येणार असून तरी कोणत्याही फटाका स्टॅालवर हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्री साठी ठेऊ नये कारण लक्ष्मी मातेचे फोटो असलेले फटाके फोडल्यानंतर आपल्या हिंदू देव देवतांच्या फोटोचे तुकडे तुकडे होतात व नंतर पायदळी तुडवले जातात एक प्रकारे आपल्या देवदेवतांची अवहेलना होत आहे.

    काही दुकानदार मालकांनी पत्र मिळताच दिलेली ऑर्डर दिलेली कॅन्सल केली.या वेळी हिंदू समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या