मावळ दि.२७ - मावळ तालुक्यातील ताजे ता.मावळ येथे लहान मुलांना भजनाची आवड निर्माण व्हावी व त्यांना भजन,वादन स्वरामध्ये गाता यावं या उद्देशाने बाल वारकरी शिक्षण शिबिर पंडित किरण परळीकर यांच्या मार्गदर्शने तसेच ह.भ.प. किसन केदारी व ह.भ.प.सुरेश केदारी च्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक २७/१०/२०२२ रोजी ताजे येथे ताजुबाई मंदिर येथे घेण्यात आले.
या शिबिरामध्ये मावळ तालुक्यातील १०० बाल वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात स्तोत्रपठण, मुलांना स्वरांचा रियाज कसा करावा तसेच 'सा व आकार" चा रियाज करून घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र केदारी,गोविंद कदम सर यांनी व आभार दत्ता केदारी यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमापासून प्रसंगी प्रतिक म्हाळस्कर, उपसरपंच सचिन केदारी , लक्ष्मण बालगुडे ,अभिमन्यू शिंदे, नवनाथ थोरवे, गोरख केदारी ,जयवंता केदारी ,राजू पिंगळे ,संतोष केदारी, हिरामण केदारी, खंडू केदारी, बाळू सुतार,मनोहर केदारी, बंडू केदारी, खंडू मा.केदारी, तसेच महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता.
0 टिप्पण्या