रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मावळ तालुका युवक अध्यक्षपदी अंकुश सोनवणे यांची निवड करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नवीन कार्यकारणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केली.पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी निवडीची घोषणा केली.अंकुश सोनवणे यांना या निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, युवक अध्यक्ष महाराष्ट्र पप्पू कागदे,पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर जाधव, रवि गायकवाड ,दिलीप दामोदर, नागेश् ओव्हाळ, सुनिल पवार, संदीप शिंदे, कमलशिल म्हस्के, अनील भांगरे, दाजीबळ सोनवणे, रुपेश गायकवाड ,रामदास गायकवाड, शरद सोनवणे महेंद्र सोनवणे, प्रफुल भालेसेईन आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या