Ticker

6/recent/ticker-posts

बाळा भेगडे यांचे राजकीय वजन वाढत आहे का !....

पंढरपुर मधील पोट निवडणूकीची जबाबदारी,  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदार संघाची जबाबदारी आता गुजरात येथील नवसारी जिल्हा च्या निरिक्षक पदी निवड झाल्याने मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे राजकीय वजन वाढत आहे.

       बाळा भेगडे यांना मागील वर्षी पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती.बाळा भेगडे हे महिनाभर पंढरपूर-मंगळवेढा येथे आपल्या कार्यकर्त्या बरोबर तळ ठोकून काम करत होते.त्याच्या बुथ कमिटी  नियोजन बद्ध प्रचार कार्याने भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले होते.त्यानंतर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोवा विधानसभा निवडणूकित गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती.तिथे देखील प्रभावी नियोजन करून प्रमोद सावंत यांच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता.

      मावळ तालुक्यात तहसील कार्यालय,तरुणांच्या रोजगारा बाबत मागील काही दिवसांपासून बाळा भेगडे आक्रमक भुमिकेमुळे चर्चेत आले आहेत. 

     मा.राज्यमंत्री बाळा भेगडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू माणले जातात वेगवेगळ्या राज्यांमधील जबाबदारी मिळने ही भविष्यात मावळ तालुक्याला मोठे प्रतिनित्व मिळते कि काय याची चाहूल नक्की च लागली.
--------------------------–---------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या