Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रभक्त विनायक सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिका केल्या विरोधात हिंदू उत्सव समितीच्या वतीने कामशेत पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल....

कामशेत दि.१२- राष्ट्रभक्त विनायक सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिका केल्या विरोधात हिंदू उत्सव समितीच्या वतीने कामशेत पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
सोशल मीडिया ट्विटर वरील अनुज पाठक नावाने अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीकडून स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर,तसेच हिंदू धर्म, हिंदुत्त्व वर सतत आक्षेपार्ह टिप्पणी होते.सदर व्यक्तीवर कारवाई व्हावी यासाठी हिंदू समिती कामशेत शहराच्या वतीने कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगतापसाहेबांना निवेदन देण्यात आले.
 
  या वेळी अर्जुन शिंदे, अभिमन्यु शिंदे,प्रविण शिंदे,समिर भोसले,तुषार पवार,सनि टकले,कमलेश तारु ,रमेश पार्टे आदी हिंदु उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------–---–-------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या