कामशेत दि.१-भारतीय टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीने विमा क्षेत्रातील योजना आणली आहे. ३९९ च्या वार्षिक हप्त्यामध्ये विमाधारकास १० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.या योजनेचा कामशेत मध्ये शुभारंभ दि. १ रोजी श्री विठ्ठल मंदिर कामशेत गावठाण येथे भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,कामशेत भाजपा युवा शहराध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते शंकरनाना शिंदे ,पुणे जिल्हा आर पी आय संपर्क प्रमुख समीर जाधव मा.सरपंच विजय शिंदे, आरपीआय युवा मावळ अध्यक्ष संतोष कदम, सोनू गायकवाड,कामशेट शहर उपाध्यक्ष रमेश बच्चे यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीने विमा कंपनी व टपाल खात्याच्या या अभिनव योजनेचा देशातील गरिब आणि मध्यम वर्गासाठी मोठा फायदा होणार आहे. ही योजना १८ ते ६५ वयांतील व्यक्तींसाठी आहे या योजनेचा फायदा जास्तीत लोकांनी घ्यावा असे अभिमन्यू शिंदे यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले.
(३९९ रुपयांच्या पॉलिसीमध्ये आपणास काय मिळणार....)
१)विमाधारकाचा अपघाती मृत्यू , अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल.
२) विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास ६० हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास ३० हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल.
कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम देण्यात येणार आहे. इतर अनेक लाभ या योजने अंतर्गत मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी
संपर्क- अभिमन्यू शिंदे - ९२७०१२५११२, प्रविण शिंदे - ९६७३६३६३२०, बबलु सुर्वे -९९७५०३७५६६, समिर भोसले-८४८२९६९६४४
0 टिप्पण्या