Ticker

6/recent/ticker-posts

हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आयोजित खुल्या गटातील निबंध स्पर्धेत प्राध्यापक धनंजय मिठारे यांना द्वितीय क्रमांक...


तळेगाव दाभाडे येथील हिंद विजय नागरी पतसंस्था मर्यादित यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या खुल्या गटातील निबंध स्पर्धेत , कामशेत येथील प्रबोधन क्लासेसचे संचालक प्राध्यापक धनंजय मिठारे यांनी द्वितीय क्रमांक संपादन केलेला आहे. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम व भारताच्या प्रगतीची 75 वर्षे या विषयावरील खुल्या गटातील निबंध स्पर्धेसाठी संपूर्ण मावळ तालुक्यातील जवळजवळ 400 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये 1857  ते  2022 या 165 वर्षाचा भारताचा इतिहास फक्त 400 ते 500 शब्दात नमूद करायचा होता.
 हे शिवधनुष्य प्राध्यापक धनंजय मिठारे यांनी अत्यंत लीलया  पेलले, आणि सर्व 400 स्पर्धकांमधून द्वितीय क्रमांक संपादित केला. त्यांच्या यशाबद्दल कामशेत शहरातील  सर्व नागरिकात अत्यंत समाधानाचे वातावरण आहे व सर्वांनीच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे .सर्व क्षेत्रात प्राध्यापक धनंजय मिठारे यांनी असेच उत्तुंग यश  संपादन करो व कामशेतची मान अभिमानाने उंचावू हीच अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात प्राध्यापक धनंजय मिठारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या स्पर्धेत केवळ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव भाग घेतल्याचे नमूद केले व आपले संपूर्ण यश हे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना समर्पित केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या