लोणावळा दि.१५- भारताचा ७५ स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आज आदिवासी बांधवांच्या पाड्यावर जाऊन ध्वजारोहण करण्यात आले .
भारतीय जनता पार्टीच्या (ओळकाईवाडी) कुसगाव बुद्रुक माध्यमातून मिठाई व बिस्किट आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले.भारतीय जनता पार्टी ओळकाईवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला .
या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आशुतोष मिश्राजी, चव्हाण मास्टरसाहेब, अनिल पाटीलसाहेब, सामाजिक कार्यकर्ते दीपक ठाकर, प्रमोद पांडे, वसंत टेमगरे, रवि भोसले, ओळकाईवाडी शक्ती केंद्र प्रमुख राजू शिंदे, बुथ अध्यक्ष तारासिंग बोहोरा, प्रतिम शिंदे, वैभव घनवट, प्रशांत विकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन तारासिंग बोहोरा यांनी केले.
0 टिप्पण्या