कामशेत दि. 12 - ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय साई (नाणौली) येथे भारतीय डाक 399 रुपये वार्षिक इतक्या माफक हप्त्याने उपलब्ध करून दिलेली अपघात विमा योजना सुरू करण्यात आली.यात १० लाख रुपयांचा कव्हर मिळणार आहे.ही योजनेचा नाणोली गावात मा. सरपंच पल्लवीताई रामदास वाघुले यांच्या प्रयत्नातून पार पडली .साई,नाणोली ग्रामस्थ यांनी या योजनेचा लाभ घेतला.
यावेळी साई ग्रुप ग्रामपंचायतीच्या मा सरपंच सौ पल्लवीताई रामदास वाघुले, सरपंच जयश्री हनुमंत वाडेकर ,उपसरपंच सौ मंदाताई सोपान गाडे , मा सरपंच एकनाथ वाडेकर,विक्रम वाघूले,आदिनाथ वाडेकर ,अमोल वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या