कामशेत दि.१४- भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने या "अमृत महोत्सवी" वर्षानिमित्त मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या "हर घर तिरंगा अभियान" अंतर्गत मा.मंत्री बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे व भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्या माध्यमातून भव्य दुचाकी " तिरंगा रॅली" काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात सोमाटणे फाटा येथून स्वर्गवासी विनायक मेटे यांना आदरांजली वाहून करण्यात आली.भारत माता की जयच्या घोषणा करत मंगलमय वातावरणात सोमाटणे फाटा येथुन मार्गस्थ होत तळेगाव,वडगाव,कान्हे, कामशेत पर्यत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने स्वतःची टू व्हीलर व त्यावर तिरंगा ध्वज लाऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठिक ठिकाणी रॅलीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.कामशेत मधे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे , राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात प्रास्ताविक हर घर तिरंगा अभियान मावळ संयोजक गुलाबकाका म्हाळसकर यांनी व आभार कामशेत शहर अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते माऊली शिंदे,राजाराम शिंदे,प्रशांत ढोरे, शांताराम कदम,शंकरनाना शिंदे, गणेश गायकवाड, संतोष कुंभार,संतोष दाभाडे ,जि.प.सदस्य नितिन मराठे,प्रविण चव्हाण,सरचिटणीस मच्छिंद्र केदारी,तळेगाव शहर अध्यक्ष रविंद्र माने, वडगाव अध्यक्ष अनंता कुडे,देहूगाव अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल,जितेंद्र बोत्रे,कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे,प्रदिप हुलावळे,संघटणमंत्री गणेश ठाकर,यादव सोरटे,सागर शिंदे, नामदेव वारींगे,विकास लिंभोरे,नामदेव शेडगे,सचिन भांडे,सुभाष धामनकर, रवि शेटे, यांच्यासह भागाचे, गणाचे अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या