मावळ- पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने दिला जाणारा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार मावळ तालुक्यातील जांभुळ ग्रामपंचायतला मिळाला.सदर पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगतसिंग कोष्यारी, सी.ओ.आयुष प्रसाद यांच्या हस्ते ग्रामपंचायत वतीने लोकनियुक्त आदर्श सरपंच नागसेन ओव्हाळ व ग्रामसेविका कल्याणी लोखंडे यांनी स्विकारला.
जांभूळ सांगवी गावातील माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, तरुण वर्ग,वारकरी संप्रायातील, मा.सरपंच, उपसरपंच, सदस्य,विद्यमान उपसरपंच एकनाथ गाडे, मा. सरपंच, विद्यमान सदस्य संतोष जांभूळकर, सदस्य अमित ओव्हाळ, मा.उपसरपंच कुंदाताई खांदवे, सदस्या कल्पना काकरे, तृप्ती जांभूळकर,स्नेहल प्रशांत ओव्हाळ,रुपाली गायकवाड ,रखाबई भोईर यांच्या विशेष कामामुळे तसेच जांभूळ, सांगवीतील सर्व नागरिकांच्या आशीर्वादामुळे सदर पुरस्कार मिळाला असे सरपंच नागसेन ओव्हाळ यांनी बोलताना संगितले.
0 टिप्पण्या