Ticker

6/recent/ticker-posts

खटला जलद गतीने चालवून मावळच्या लेकीला नाय मिळून देणार - देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री

मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावामधील सात वर्षीय स्वरा चांदेकर हिची अत्यंत विकृतपणे निंदणीय हत्या झाल्याने संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

अशा अमानवी कृत्य करणा-या नराधमाला कडक शासन झाले पाहिजे याकरीता बजरंग दल,मावळ व दुर्गा वाहिनी यांच्या माध्यमातून पवना-नगर चौकात जाहीर उपोषण घेण्यात आले होते.

दिनांक ७ रोजी पवना-नगर येथे बजरंग दल व दुर्गावाहिनी यांच्या जाहीर उपोषणातून ज्या मागण्या करण्यात आल्या होत्या त्याकरीता बाळाभाऊ भेगडे यांनी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आपल्या शिष्टमंडळासह भेट घेऊन स्वराला न्याय देण्याचे काम करू असे आश्वसन दिले.

     स्वराचे वडील व बजरंग दल मावळ तालुका यांच्या शिष्टमंडळासह राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुंबई येथील सागर निवास्थानी भेट घेऊन या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तसेच शासनाने या आरोपीला अतिशय कडक शासन व्हावे अशी मागणी यावेळी केली.

     बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, मावळच्या लेकीला लवकरात लवकर न्याय मिळवुन देण्यात येईल. मी या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असून या प्रकरणासाठी चांगल्यात चांगला वकील देणार असून ही केस फास्टट्रॅक पद्धतीने चालवणार आहे व या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीने जी काही मदत करता येईल ती करण्यात येईल तसेच मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ५ लाखाची मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या वेळी विभाग मंत्री संदेश भेगडे, भा.ज.पा. संघटन मंत्री गणेश ठाकर, मुलीचे वडील जनार्दन चांदेकर, गणेश सावंत, सह संयोजक बजरंग दल बाळा खांडभोर, प्रशांत ठाकर, सुनिल ढोरे, अक्षय येळवंडे, निलेश ठाकर, विश्वास दळवी, निलेश खेंगरे, महेश सोनार उपस्थित होते.

नराधमाला फाशी ची शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिले पर्यंत बजरंग दल पाठपुरवठा करत राहणार...- संदेश भेगडे (विभाग संयोजक)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या