कामशेत -भारतीय टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीने विमा क्षेत्रातील योजना आणली आहे. ३९९ च्या वार्षिक हप्त्यामध्ये विमाधारकास १० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष मा.सरपंच अभिमन्यु शिंदे ,प्रविण थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवळे येथे शनिवार दि.८ रोजी श्री गणेश मंदिर वाडीवळे येथे घेण्यात आली.
या वेळी मा.सरपंच प्रदिप हुलावळे,मा.सरपंच दत्ता पडवळ,मा.सरपंच सचिन येवले, बाबाजी मोरे यांनी या कार्यक्रमाला सदिच्छ भेट दिली. वाडीवळे गावातील ग्रामस्थ बाळासाहेब थोरवे नामदेव थोरवे, उल्हास थोरवे,सचिन थोरवे,स्वप्निल जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते..
वाडीवळे येथे या कार्यक्रमाचे आयोजन प्रविण थोरवे यांनी केले.
0 टिप्पण्या