Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात शिंदे-फडवणीस सत्तासंघर्षा नंतर मा.राज्यमंत्री बाळा भेगडे आक्रमक.....आता आमच्या कामाची स्टाइल बदलली...


मावळ -  राज्यात शिंदे-फडवणीस सत्तासंघर्षानंतर मावळ तालुक्यात मा.राज्यमंत्री बाळा भेगडे आक्रमक झाले आहे.महाविकास आघाडी सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. एमआयडीसी आंदोलन,  आंदोलन ओबीसी आरक्षण आंदोलन, सहकार निवडणुका मध्ये कार्यकर्त्यांवर राजकीय बळ वापरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत  आल्यानंतर सरकारने  राजकीय गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली.

      ,भारतीय जनता पार्टीच्या १ तारखेच्या मासिक मीटिंग मध्ये बोलताना बाळा भेगडे म्हणाले कि " महाविकास आघाडी सरकारच्या काळात  भारतीय जनता पार्टीच्या  कार्यकर्त्यांच्या जमिनीवर PMRDA च्या माध्यमातून चुकीची आरक्षणे टाकण्यात आली ,निवडणूक काळात प्रशासन बळावर खोटे गुन्हे दाखल केले अशा अनेक घटना घडल्या आहेत यापुढे माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही  जशास तसे उत्तर देऊ , आता आमची कामाची पद्धत बदलली आहे " असे बोलताना म्हणाले.

           आगामी काळात बाळा भेगडे कोणती आक्रमक भूमिका घेतात या कडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या