Ticker

6/recent/ticker-posts

बजरंग दल,दुर्गा वाहिनी यांनी केलेल्या बेमुदत उपोषणाला भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कामशेत शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा.....


पवनानगर : मावळ तालुक्यांमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना कोथुर्णे गावात घडली स्वराला न्याय मिळवून देण्यासाठी विश्व हिंदु परिषद बजरंग दल व मावळ तालुक्याच्या वतीने पवनानगर चौकात आज रविवार (दि. ७) रोजी उपोषण करण्यात आले होते.
बजरंग दलाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे 

१) नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी
२) या गुन्हयाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा 
३) पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करावे
४) विशेष सरकारी वकील नियुक्त करावा
५) विधानसभेत विशेष अधिवेशन बोलावून लेंगिक शोषण प्रतिबंधक कडक कायदा करावा
६) शाळा आणि कॉलेज परिसरात महिला पोलीस कर्मचारी नेमावे अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.ही मागणी मान्य करून स्वराला न्याय मिळावा या करता बजरंग दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या उपोषणाला कामशेत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या