Ticker

6/recent/ticker-posts

कोथुर्णे येथील निर्भयाच्या अत्याचार प्रकरणी खटला फास्टट्रॅक पद्धतीने चालवण्यात येणार असुन खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील देणार- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मावळ : कोथुर्णे येथील निर्भयाच्या अत्याचार प्रकरणी विशेष महिला पोलिस अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील देणार आहे. तसेच हा खटला देखील फास्टट्रॅक पद्धतीने चालवण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कोथुर्णे येथील निर्भयाच्या लढ्यासाठी बजरंग दलाच्या शिष्टमंडळासह माजी मंत्री बाळा भेगडे व खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्र्यांची काल बुधवार (दि. १७) रोजी भेट घेऊन आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी अशा मागणीचे निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकार या प्रकरणी गंभीर असून पीडित कुटुंबाच्या पाठीशी सरकार खंबीर पणे उभे आहे. स्वराच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरच कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा करू व स्वराला न्याय मिळून देण्यासाठी सर्वोतपरी मदत करू असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना आश्वासीत केले.

यावेळी मा. राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, खासदार श्रीरंग बारणे व बजरंग दलाचे संदेश भेगडे, गणेश ठाकर, बाळा खांडभोर, प्रशांत ठाकर, आकाश वारुळे, महेंद्र असवले, राजू  खांडभोर, विशाल ढोले, सागर ठाकर, निलेश ठाकर, अंकेश ढोरे, पवन दंडेल, मच्छिंद्र गाडे, विश्वास दळवी, सुशील वाडेकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या