पुणे जिल्ह्यातील ८१४ गावात ६९०० चौ.कि.मी जमिनीवर PMRDA ने प्रारूप आराखडा तयार केला. यात मावळ तालुक्यातील अनेक नागरिकांच्या तसेच शेतकर्यांच्या जमिनीवर चुकीच्या पद्धतीच्या आरक्षण पडली तसेच अनेक त्रुटी आराखड्यात होत्या त्यामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारे PMRDA चे आयुक्त सुहास दिवसे यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेब यांच्याकडे मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी तक्रार केली तात्काळ PMRDA चे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली
तसेच PMRDA चा संपूर्ण आराखडा रद्द करण्या संदर्भात तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या